Tuesday, 18 July 2017

मोडी आजच्या जगात | Modi In Today's World

मोडीचा आजच्या जगात अनेक प्रकारे वापर करता येतो. जसे  मोडी फॉंट आपण संगणकावर वापरू शकतो, मोडी सुलेखन करून आपले हस्ताक्षर सुधारू शकतो ( जुन्या काळात ज्याला पुस्ती म्हणत.), चित्रकला, रांगोळी, वेगवेगळे  नमुने, परिकल्प यांमध्ये मोडी वापरू शकतो, इत्यादी. त्यापैकी काही उदाहरणे आपण खाली पाहू.


फॉंट
मोडी लिपीसाठी MihailJP यांनी येथे मोफत मोडी फॉंट उपलब्ध करून दिला आहे. जर तुम्ही कोडर असाल आणि मोडीसाठी काही करायची इच्छा असेल तर या गीटहबवर तुम्ही आपले योगदान देऊ शकता. तसेच कौस्तुभ  कस्तुरे यांनी त्यांच्या ब्लॉगवर एक फॉंट सामायिक केला आहे.
या फॉंट्सचा लाभ घेऊन तुम्ही संगणकावरही मोडी लिपीत लिहू शकता.

कला
प्रसिध्द चित्रकार मायकल हफ्त्का यांनी मोडी लिपी वापरून अमृतानुभव नावाची चित्रमालिका तयार केली आहे. तिचा आनंद तुम्ही येथे घेऊ शकता.

त्याच प्रमाणे पिंटरेस्ट या साईटवर अनेक लोकांनी आपली कला सदर केलेली आहे, त्यातून प्रेरणा घेऊ शकता.

प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांनी मोडी लिपीत अत्यंत सुरेख सुलेखन केले आहे. ते तुम्ही इथे बघू शकता.
No comments:

Post a Comment